हरणगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:58 IST2020-09-21T22:51:02+5:302020-09-22T00:58:52+5:30
पेठ : तालुक्यातील हरणगाव व परिसरातील युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

हरणगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
पेठ : तालुक्यातील हरणगाव व परिसरातील युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
तरुण मित्रमंडळाच्या सहकाºयाने सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यतिन पाटील यांनी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाºया युवक युवतींना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन व योग्य सल्ला मिळाल्यास यशाचे शिखर गाठण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक माच्छिंद्र कोल्हे, पोलीस हवालदार देशपांडे, गुंबाडे, माजी सैनिक संजय भरसट, विजय भरसट, यांच्यासह तरुण मित्रमंडळाचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. विष्णू भरसट यांनी सूत्रसंचलन केले.