शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

तालुक्यातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 6:26 PM

कळवण : तालुक्यात १२ ते १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

ठळक मुद्देकळवण : आमदार नितीन पवार यांची माहिती; रक्कम होणार खात्यात जमा

कळवण : तालुक्यात १२ ते १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.अवकाळी पावसामुळे १०७७३ शेतकऱ्यांच्या २८७५ हेक्टर क्षेत्रातील मका, बाजरी, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १ कोटी ९५ लाख ५१ हजार ३६० रुपये नुकसानभरपाईचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९० गावांतील ५८६८ शेतकऱ्यांना १ कोटी ४३ लाख ४६ हजार ३६० रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाला असून, दुसऱ्या टप्प्यात ६० गावांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्यासमवेत आमदार पवार यांनी बाधित गावांतील पिकांची पाहणी करून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना नुकसानीची माहिती देत भरपाई देण्याची मागणी केली होती.सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे अभोणा, अंबापूर, अंबिका ओझर, अंबुर्डी (बु), अंबुर्डी (खुर्द), आमदर, आठंबे, बगडू, बालापूर, बार्डे, जुनी बेज, बेलबारे, बेंदीपाडा, भादवण, भगुर्डी, भाकुर्डे, भांडणे (हा ), भांडणे (पि), भेंडी, भुताने(दि), बिजोरे, बिलवाडी, बोरदैवत, चाचेर, चणकापूर, चिंचोरे, दह्याने (दि), दळवट आदी ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये मंजूर झाले असून, ६० गावांतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप बाकी आहे. 

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार