निसर्ग चक्र ीवादळातील नुकसानग्रस्तांना भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:12 IST2020-08-21T23:31:58+5:302020-08-22T01:12:52+5:30
मे महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने बागलाण तालुक्यात पन्नासहून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली होती. नुकसान झालेल्या पशुपालकांना पहिल्या टप्प्यातील दोन लाख ६४ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त झाले असून, धनादेशाचे वाटप आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

राहुड येथे पशुपालकांना धनादेशाचे वाटप करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत पी. एस. नेरकर, सी.पी. अहिरे आदी.
सटाणा : मे महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने बागलाण तालुक्यात पन्नासहून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली होती. नुकसान झालेल्या पशुपालकांना पहिल्या टप्प्यातील दोन लाख ६४ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त झाले असून, धनादेशाचे वाटप आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
बागलाण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला फटका बसला होता. सुमारे ६७ जनावरे दगावली होती. पंचनामे करून भरपाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोळा शेतकऱ्यांना दोन लाख ६४ हजार रु पयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शुक्र वारी (दि. २१) राहुड येथे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते शेतकºयांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार पी. एस. नेरकर, मंडळ अधिकारी सी.पी. अहिरे, सागर रोकडे, तलाठी अर्जुन आव्हाळे आदी उपस्थित होते.