शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

415 घरांसाठीची भरपाईही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 1:32 AM

गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे.  शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात  घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली  होती. मात्र वर्षभरानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही. 

ठळक मुद्दे ८५ लाखांची मागणी : यंदा मदत मिळण्याची शक्यता 

नाशिक : गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे.  शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात  घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली  होती. मात्र वर्षभरानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही. गतवर्षी  जूनमध्ये जिल्ह्यातून निसर्ग चक्रीवादळ जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पुढे सरकणाऱ्या चक्रीवादळाने दिशा बदलली आणि कोकण व नंतर मुंबईमार्गे निसर्ग चक्रीवादळ नाशिकला स्पर्शून पुढे गेले होते. या कालावधीत जिल्ह्यात जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५३० हेक्टरवरील पिकांना या वादळाचा फटका बसला होता तर ४१५ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.   घरांचे छत व पत्रे उडाले होते तर अनेक ठिकाणी भिंत खचल्या तसेच भिंतीदेखील कोसळल्याने अनेकांना रात्र उघड्यावर काढावी लागली होती. अहवाल रवानाजिल्हा प्रशासनाने  पंचनामे पूर्ण करून  शासनाकडे ३०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला होता.  त्यापैकी २२२ कोटी ९८ लाख ९१ हजारांची मदत जिल्ह्याला मिळाली.  मिळालेल्या रकमेपैकी फळबागा, शेतपिके, पशुधन आदींसाठी २२२ कोटी १३ लाख ९१ हजारांची मदतीचा त्यात समावेश होता. त्यात घर पडझडीची मदत प्राप्त झाली नव्हती. शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. वर्षभरानंतर का होईना या जूनमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारMONEYपैसाHomeघर