निर्यातबंदीमुळे झालेल्या नूकसानीची भरपाई द्या ; कांदा उत्पादकांकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 20:59 IST2020-03-03T20:58:04+5:302020-03-03T20:59:21+5:30

सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

Compensate for losses caused by the export ban; Demand for onion growers | निर्यातबंदीमुळे झालेल्या नूकसानीची भरपाई द्या ; कांदा उत्पादकांकाची मागणी

निर्यातबंदीमुळे झालेल्या नूकसानीची भरपाई द्या ; कांदा उत्पादकांकाची मागणी

ठळक मुद्देनिर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे नूकसान झाल्याचा आरोप कांदा उत्पादकांना नूकसान भरपाई देण्याची मागणी

नाशिक :  केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमामात नूकसान केले असून निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात दिरंगाई करून त्यात आणखी भर घातल्याचा आरोप करीत सरकराने या निर्णयामुळे नूकसान झालेल्या कांदा उत्पादकांना कांदा विक्रीचे प्रतिकिलो पाच रुपये अनुदान नूकासन भरपाई म्हणून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. 
निर्यातबंदीमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच अशा प्रकारामुळे निर्यात बंदी उठविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून अशा प्रकारामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२० या ४५ दिवसांच्या कांदा विक्र ीचे ५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे नूकसान भरपाई देण्याची मागणी  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, शैलेंद्र पाटील,  शिवाजी पवार,कुबेर जाधव, जयदीप भदाणे, संजय साठे, चंद्रकांत शेवाळे, विलास गांगुर्डे,  विजय भोरकडे, भगवान जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

Web Title: Compensate for losses caused by the export ban; Demand for onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.