५५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:26 IST2018-05-12T15:26:56+5:302018-05-12T15:26:56+5:30

Community marriage of 551 couples | ५५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

५५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

शाम खैरनार/सुरगाणा : आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरीबी आहे. पावसाळ्यात काम संपले की कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन पोषणा करीता घरदार सोडावे लागते.शहरात विवाह सोहळ्यात लाखो रु पये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील.खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी गुजरात राज्यातील सिमेवरील हडकाईचोंड येथे स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी संस्था व बिरसा मुंडा प्रतिष्ठान समिति यांनी आयोजित केलेल्या पाचशे एकावन्न आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळ्यात बोलतांना केले. यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार जिवा पांडू गावित, माऊली धाम त्र्यंबकेश्वर रघुनाथ महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आयोजक भरत भोये, वनवासी कल्याण आश्रमचे क्षेत्रीय मंत्री संजय कुलकर्णी, समीर चव्हाण, एन.डी.गावित, रामजी गावित, रमेश थोरात, सुरगाणा नगराध्यक्ष रंजना लहरे, सुरेश गवळी,रतन चौधरी, भरत कोल्हे,विजय कानडे, सदू गांगुर्डे, विजय कानडे, विजय पवार,रोशन पगारे,राहुल अहेर, धर्मेन्द्र पगारिया, ललित चव्हाण, राहुल अहेर,राकेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टाळू आहे गरीब आहे. लग्न, आजारपण हे टाळता येत नाहीत म्हणून खर्च कमी होण्या करीता सर्वच समाजात सामुदायिक विवाह ही अत्यंत काळाची गरज बनली आहे.

Web Title: Community marriage of 551 couples

टॅग्स :Nashikनाशिक