शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:21 IST

नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.

ठळक मुद्देम. रा. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अन्नत्याग दिवस आंदोलन

नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.

शासनाने शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावे म्हणून २०१७ पासून राज्यातील शेतकरी वर्ग १ दिवसाचा उपवास करतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी सामुदायिक उपवास करत आहेत. एक दिवस अन्नत्याग आंदोलन संपूर्ण राज्यात पोहोचेल आणि शासन दरबारी शेतकरी प्रश्न निकाली निघतील असा विश्वास शेतकरी पुत्रांना आहे, असे मत पगार यांनी व्यक्त केले आहे.बाजार समिती सभापती संजय भामरे, संचालक भाऊसाहेब अहिरे, पोलीस पाटील बाळासाहेब ठाकरे, सचिन आहिरराव यांनी पाठिंबा दिला. सदर आंदोलनाला बागलाण तालुका माजी जवानांना पाठिंबा दिला आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सदर अभिवादन स्थळी भेट दिली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद‌्भावना व्यक्ती केली. डिंगम्बर धोंडगे, हर्षल अहिरे, सुभाष शिंदे, रवींद्र धोंडगे, राहुल पगार, योगेश पगार, देविदास पगार, भाऊसाहेब पगार, शेखर कापडणीस यांनी सामुदायिक अन्नत्याग केला.

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, कोणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये ही भावना मनात कायम आहे. एक जवान म्हणून अभिवादन करतांना खूप वेगळ्या भावना आहेत. ३५ वर्षांपूर्वी रावसाहेब करपे व मालती करपे यांनी ४ मुलांसह आत्महत्या केली. आज पण आत्महत्या सुरूच आहेत. या आत्महत्या शासनाने थांबवाव्यात व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद‌्भावना निर्माण व्हावी म्हणून केलेल्या अन्नत्याग आंदोलनला आमच्या माजी जवानांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.- विश्वास पगार, माजी जवान. (२४ नामपूर १,२) 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप