पंचवटी कार्यालयात आयुक्तांची ‘सर्च मोहीम’ त्रुटी आढळल्या : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:25 IST2018-04-04T00:25:26+5:302018-04-04T00:25:26+5:30
पंचवटी : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ३) पंचवटी विभागीय कार्यालयात सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन सर्च मोहीम राबविली.

पंचवटी कार्यालयात आयुक्तांची ‘सर्च मोहीम’ त्रुटी आढळल्या : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पंचवटी : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ३) पंचवटी विभागीय कार्यालयात सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन सर्च मोहीम राबविली. यावेळी मुंढे यांनी सर्वच विभागांना भेट देत अधिकाºयांची खरडपट्टी केली. यावेळी, अनेक त्रुटी आढळल्यानंतर अधिकारी काय काम करतात हे सांगता न आल्याने तसेच मनपाच्या कपाटात काही दुसरीच कागदपत्रे आढळून आल्याने पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्याची वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले, तर विविध कर विभागांतील कर्मचाºयाचे निलंबन करण्यात आल्याचे समजते. सुमारे तीन तास पंचवटी विभागीय कार्यालयात आयुक्तांनी ठाण मांडल्याने कार्यालयातील कर्मचाºयांची चांगलीच दमछाक झाली. अधिकारी-कर्मचारी मनपाच्या कार्यालयात येणाºया नागरिकांना कशाप्रकारे सुविधा देतात यासाठी मुंढे यांनी मंगळवारी पंचवटी विभागीय कार्यालयात सर्च मोहीम राबविली. सकाळी १० वाजता विभागीय कार्यालयातील घरपट्टी, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, विविध कर, आरोग्य विभाग आदींसह अन्य कार्यालयाला आयुक्तांनी भेट दिली, तर कार्यालयातील कपाटात दडलेल्या कामांच्या व अन्य फाइलचीही तपासणी केली. यावेळी कामकाजात त्रुटी आढळून आल्याने आयुक्तांनी सर्वच विभागांतील कर्मचारी तसेच अधिकाºयांचा समाचार घेत फाइल्स तपासणीसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना केल्या. तसेच सर्वच विभागांच्या अधिकाºयांना बंद कॅबिनमध्ये बोलावून सूचना देत कानउघडणी केल्याचे समजते. या पाहणी दरम्यान मनपाच्या कपाटात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने मनपा अधिकाºयाला तयार करायला लावलेली इस्टिमेटची फाइल, तसेच लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने केलेल्या कारवाईच्या जबाबाची कागदपत्रे आढळून आल्याने मुंढे यांनी फाइल व जबाबाची चौकशी केली. याचवेळी एका उपअभियंत्याला संगणकावरील पासवर्ड सांगता न आल्याने त्याची वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र, सायंकाळपर्यंत अधिकृत आदेश महापालिका प्रशासनाकडून निर्गमित झालेले नव्हते.