औरंगपूर येथील उपबाजार समितीच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:15 IST2021-05-05T22:21:45+5:302021-05-06T01:15:53+5:30
सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार म्हणून शासकीय मान्यता मिळालेल्या औरंगपूर येथील बाजार समितीच्या जागेवर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य संजय खालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

औरंगपूर येथे बाजार समितीच्या कामाचा शुभारंभ करतांना संजय खालकर, सचिव बाजारे व इतर.
सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार म्हणून शासकीय मान्यता मिळालेल्या औरंगपूर येथील बाजार समितीच्या जागेवर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य संजय खालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
औरंगपूर येथे पाच हेक्टर जागेवर साकारणाऱ्या उपबाजार आवारात कामाला सुरुवात करण्यात आली. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सायखेडा, पालखेड, ओझर येथे उपबाजार आवार आहे. मात्र, सिन्नर, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यातील कांदा पिंपळगाव किंवा सायखेडा बाजार समितीत विक्रीसाठी येतो जवळपास शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते, शेतकऱ्यांना अंतर कमी पडावे, सायखेडा बाजार आवारात कमी पडणारी जागा आणि व्यापाऱ्यांना वखारीसाठी जागा मिळत नसल्याने औरंगपूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या पाच हेक्टर जागेवर बाजार आवार होणार आहे.
पणन विभागाने यासाठी परवानगी दिली असून जागादेखील हस्तांतरित झाली आहे. जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले असून लवकरच बाजार समितीचे कामकाज सुरू होऊन कांदा खरेदी-विक्री सुरू होणार आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव बाजारे, सोपान खालकर, प्रकाश बागल, गोरख खालकर, बाळासाहेब खालकर शांताराम इंधे आदी उपस्थित होते.