दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार माल खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:23 IST2021-10-17T21:21:36+5:302021-10-17T21:23:07+5:30

दिंडोरी : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी येथील मुख्य आवारात धान्य (भुसार) शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार शुभारंभ समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला.

Commencement of purchase of Bhusar goods at Dindori Agricultural Produce Market Committee | दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार माल खरेदीचा शुभारंभ

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार माल खरेदीचा शुभारंभ

ठळक मुद्देशुभारंभ समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांच्याहस्ते

दिंडोरी : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी येथील मुख्य आवारात धान्य (भुसार) शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार शुभारंभ समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला.
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमालाची योग्य ती निवड करून दिंडोरी मार्केट यार्डात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन देशमुख यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक गुलाब जाधव, वाळू जगताप, अमित चोरडिया, रमेश जाधव व व्यापारी रवी देशमुख, संदीप पवार, सचिन कर्पे, अलकेश साबद्रा, प्रशांत समदडिया, माणिक पवार, कृष्णा कर्पे, किरण बिरारी, रवी जाधव सचिव जे. के. जाधव व कर्मचारी उपस्थित होते. (१७ दिंडोरी बाजार)

Web Title: Commencement of purchase of Bhusar goods at Dindori Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.