मनपातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:26 IST2020-10-21T23:08:22+5:302020-10-22T00:26:48+5:30
नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्यासह अन्य प्रकरणांच्या चौकशीला अखेरीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीची पहिली बैठक पार पडली. यात मुद्रांक महानिरीक्षकांना पत्र पाठवून दराची पडताळणी करण्याचा करण्याचे पहिल्या बैठकीत ठरवण्यात आले.

मनपातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ
नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्यासह अन्य प्रकरणांच्या चौकशीला अखेरीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीची पहिली बैठक पार पडली. यात मुद्रांक महानिरीक्षकांना पत्र पाठवून दराची पडताळणी करण्याचा करण्याचे पहिल्या बैठकीत ठरवण्यात आले.
महापालिकेत वेळावेळी देण्यात आलेले टीडीआर घोटाळे वादग्रस्त ठरले आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर २९५/१ मधील भूखंडाच्या बदल्यात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शाळा, खेळाचे मैदानाचे आरक्षण होते. सदरचा भुखंड सिन्नर फाटा येथे असताना नाशिकरोड येथील बिटको चौक ते उड्डाणपुलापर्यंत जागा दाखवून या जागेसाठी असलेला रेडीरेकनर वसूल करण्यात आला आहे. म्हणजेच सरकारी बाजार भाव ६ हजार ९०० रुपये प्रति चौरस मीटर असताना प्रत्यक्षात टीडीआर देताना २५ हजार १०० प्रति चौरस मीटर दशर्वून टीडीआर देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेचे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले अशी तक्रार आहे, तर दुसरीकडे २००९ ते २०१२ यादरम्यान देवळाली व मौजे नाशिक शिवार तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्याच्या ११ प्रस्ताव असून, त्यात रेल्वे विभागासाठी आरक्षित भूखंडाचे भूसंपादन करण्याची जबाबदारी नसतानाही महापालिकेने त्यासाठी मोबदला दिला, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. या संदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने शहर विकास आराखड्यातील तीन भूखंडांची माहिती घेतली.