पेठ येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात गुरुचरित्र पारायणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:25 IST2021-01-15T17:25:03+5:302021-01-15T17:25:23+5:30
पेठ : सद्गुरु रमणनाथ महाराज बहुउद्देशीय संस्था तानसा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महादेव मंदिर प्रांगणात गुरुचरित्र पारायण व रामकथावाचन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

पेठ येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात गुरुचरित्र पारायणास प्रारंभ
मठाधिपती अलोकनाथ महाराज यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला. पेठ शहरासह तालुक्यातून भाविक सहभागी झाले आहेत. नऊ दिवस सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात दररोज सकाळी आरती, भजन, वाचन, प्रवचन व ह.भ.प. संजय महाराज जाधव यांचे श्रीरामकथावाचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.