देवळे परिसरात काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 00:15 IST2021-06-12T23:12:07+5:302021-06-13T00:15:19+5:30
इगतपुरी : डोंगरी विकास अंतर्गत आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून देवळे (ता. इगतपुरी) येथील औद्योगिक परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (दि.१२) पंचायत समिती उपसभापती विमल तोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

देवळे (ता. इगतपुरी) : डोंगरी विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करताना विमल तोकडे यांसह उपस्थित शेतकरी, व्यापारी बांधव.
ठळक मुद्दे डोंगरी विकास निधी अंतर्गत तीस लक्ष रुपयांचा निधी
इगतपुरी : डोंगरी विकास अंतर्गत आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून देवळे (ता. इगतपुरी) येथील औद्योगिक परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (दि.१२) पंचायत समिती उपसभापती विमल तोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, माजी सभापती रघुनाथ तोकडे, ॲड. विजय कर्नावट, उद्योजक संजय चोरडिया, संजय कुमट यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. डोंगरी विकास निधी अंतर्गत तीस लक्ष रुपयांचा निधी आमदार खोसकर यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला.