बसच्या चाकाखाली येऊन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:32 IST2020-01-13T01:31:50+5:302020-01-13T01:32:43+5:30
नवीन बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपकार चित्रपटगृहासमोर बसच्या मागील चाकाखाली येऊन शुभम संजय पवार (१८, रा. अयोध्यानगर, सोयगाव) हा तरुण ठार झाला, तर एक जण जखमी झाला.

बसच्या चाकाखाली येऊन तरुण ठार
मालेगाव : नवीन बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपकार चित्रपटगृहासमोर बसच्या मागील चाकाखाली येऊन शुभम संजय पवार (१८, रा. अयोध्यानगर, सोयगाव) हा तरुण ठार झाला, तर एक जण जखमी झाला. रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास मित्राबरोबर दुचाकीवर नवीन बसस्थानकाकडे जात असताना बसच्या (क्र. एमएच २० बीएल १३८७) मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालय परिसरात शुभमच्या नातेवाइकांसह सोयगाव परिसरातील संतप्त जमाव जमला होता. या अपघातात दुचाकीवर शुभमच्या मागे बसलेला मित्र जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.