नवरात्रोत्सवानिमित्त देवी मंदिरांना रंगरंगोटीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:16 IST2019-09-14T00:15:54+5:302019-09-14T00:16:17+5:30
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरांसह परिसरातील अन्य देवी मंदिरांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त देवी मंदिरांना रंगरंगोटीचे काम सुरू
पंचवटी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरांसह परिसरातील अन्य देवी मंदिरांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रविवार, दि. २९ रोजी घटस्थापना असल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळीपासून भाविकांची गर्दी होणार असल्याने नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे.
पुरामुळे नुकसान
गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरात नवरात्रोत्सवात भाविक गर्दी करतात. मंदिराला रंगरंगोटी करण्यापाठोपाठ गोदावरीला आलेल्या पुरामुळे मंदिराचे काही नुकसान झाल्याने डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परिसरात नवरात्रोत्सव साजरा करणाºया अनेक मित्रमंडळांनी देवी मंदिराला रंगरंगोटी करून सजावट करण्याचे काम हाती घेतले आहे.