हातरुडीतील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 22:48 IST2022-01-24T22:46:48+5:302022-01-24T22:48:14+5:30

सुरगाणा : महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी भारती तुकाराम चौधरी वय १७ रा. हातरुडी हिने (दि.२३) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील पडवीमध्ये लाकडी दांड्याला फडकीने गळफास लावून आत्महत्या केली.

College girl commits suicide in Hatrudi | हातरुडीतील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

 भारती चौधरी

ठळक मुद्देमोबाईल घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याचा काकांचा आरोप

सुरगाणा : महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी भारती तुकाराम चौधरी वय १७ रा. हातरुडी हिने (दि.२३) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील पडवीमध्ये लाकडी दांड्याला फडकीने गळफास लावून आत्महत्या केली.

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते. तिचे काका हिरामण चौधरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे एक ते दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही, पुरेसे नेटवर्क पण उपलब्ध नाही, मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही तसेच सारखे घरी राहून कंटाळली होती. या कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या काकांनी सांगितले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
 
Web Title: College girl commits suicide in Hatrudi