नाशिक : उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत मोठे नेते शहराच्या दौऱ्यावर... त्यांच्यासोबत आढवा बैठक अन् मोठ्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील लग्नसोहळा, यामुळे रविवारही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा धावपळीतच गेला. या दरम्यान, दिवसभर भेटीगाठी आणि बैठकांना हजेरी लावत असताना, संध्याकाळी एका लग्नसोहळ्याला जेव्हा ते उपस्थित राहिले, तेव्हा त्यांना आपल्या खिशातील पाकीटच गायब असल्याचे लक्षात आले. नेमके पाकीट कोठे गहाळ झाले की, कोण्या भुरट्या चोराने ते पळविले, याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा होऊ शकलेला नव्हता. शहरात याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगली होती. जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट हरवले अन् कोणाला नाही सापडले, अशीच अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार संभाजीराजे भोसले यांसारखे मान्यवर नाशिक शहराच्या दौऱ्यावर आले होते. पवार यांनी शासकीय अधिकारी वर्गासोबत गंगापूर धरणालगत असलेल्या ‘ग्रेप पार्क रिसॉर्ट’ येथे आढावा बैठकही बोलाविली होती. या बैठकीला सर्वच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठक आटोपून पवार, भुजबळ यांच्यासह सर्वच वरिष्ठ शासकीय अधिकारी गंगापूर रोडवरील एका लॉन्समध्ये आयोजित लोक-प्रतिनिधींच्या कुटुंबातील लग्न-सोहळ्याला हजर राहिले. यावेळी मांढरे यांनी आपला खिसा तपासला असता, त्यांना पाकीट नसल्याचे लक्षात आले. यामुळे पाकीट नेमके गेले कोठे? असा प्रश्न त्यांना पडला. दरम्यान, मांढरे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता, त्यांनी मी आज अनेक ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे पाकीट नेमके कोठे गहाळ झाले, याबाबत सांगता येणार नाही.यंत्रणा चक्रावलीलग्नसोहळ्यातून मौल्यवान वस्तू चाेरीला जाण्याच्या घटना नाशिककरांना नवीन नाहीत. मात्र, एका बड्या राजकीय व्यक्तीच्या लग्न सोहळ्यात पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांना त्यांचे पाकीट खिशात नसल्याचे लक्षात आले आणि सुरक्षारक्षक व पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. मांढरे यांचे पाकीट त्यांच्याकडून नेमके कोठे गहाळ झाले की, कोणी चोरट्याने ते त्यांची नजर चुकवून चोरी केले, याविषयी साशंकता कायम आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट हरवले, कुणाला नाही सापडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:43 IST
उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत मोठे नेते शहराच्या दौऱ्यावर... त्यांच्यासोबत आढवा बैठक अन् मोठ्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील लग्नसोहळा, यामुळे रविवारही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा धावपळीतच गेला. या दरम्यान, दिवसभर भेटीगाठी आणि बैठकांना हजेरी लावत असताना, संध्याकाळी एका लग्नसोहळ्याला जेव्हा ते उपस्थित राहिले, तेव्हा त्यांना आपल्या खिशातील पाकीटच गायब असल्याचे लक्षात आले. नेमके पाकीट कोठे गहाळ झाले की, कोण्या भुरट्या चोराने ते पळविले, याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा होऊ शकलेला नव्हता.
जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट हरवले, कुणाला नाही सापडले!
ठळक मुद्देगहाळ झाले की चोरी, याबाबत संभ्रमावस्था