वाहनाच्या धडकेत वाहतूक बेट उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:34 IST2020-01-24T22:04:57+5:302020-01-25T00:34:36+5:30
गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे.

मालेगावी गिरणा पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट.
मालेगाव कॅम्प : शहरात मनमाड चौफुलीजवळून प्रवेश केल्यानंतर गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे.
शहरातील व बाहेरगावातून येणाºया नागरिकांमध्ये याची अद्याप दुरुस्ती न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतूक बेट त्वरित दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. नगरसेवक निधीऐवजी दुसºया निधी अंतर्गत याचे बांधकाम करण्यात आले तर हे बांधकाम करताना मुख्य रस्त्यांचा मध्यबिंदू (सेंटर) साधण्यात आला नाही तर हे बेट तांत्रिकदृट्या चुकीचे मोजमाप प्रमाणे साकारण्यात आले असा आरोप होत आहे. बांधकाम झाल्यानंतर वाहतूक बेट वाहतुकीसाठी काहीचे अडचणीचे ठरत असल्याचे वाहनचालक म्हणतात. गिरणा पुलावरून आल्याहून काही क्षणात बेट समोर दिसते. त्यामुळे चालक काहीसे बिथरतात व अपघाताची शक्यता निर्माण होते असाच अवधानाने गेल्या महिन्यात या वाहतूक बेटास अज्ञात वाहनाने धडक देऊन पोबारा केला. त्यामुळे बांधकामाचे दर्शनी भाग पूर्णत: तुटलेला आहे. अपघातानंतर दुरुस्तीसाठी मनपाचे दुर्लक्ष होत आहे. हे वाहतूक बेट खरे अर्थाने चांगल्या पद्धतीने बांधून त्यामध्ये सायकलस्वाराचा धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. सायकल चालविणे आरोग्यासाठी चांगले आहे हा संदेश सर्वत्र जातो परंतु बांधकामानंतर याचा देखभालीकडे दुर्लक्ष झाले. यामध्ये जंगली गवत उगले आहे. तर सायकल पुतळा दिसेनासा झाला आहे व अपघातानंतर याची दुरावस्था झाली आहे. शहरात पुणे, मुंबई, नाशिककडे ये-जा करणारे असंख्य वाहने येथूनच प्रयाण करतात त्यामुळे या उद्ध्वस्त बेटाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे लवकर या वाहतूक बेटाचे पुन्हा सुशोभीकरण करण्याची मागणी होत आहे. शहर विकास आराखडा निधीअंतर्गत टेहरे फाटा, दरेगाव व गिरणापुल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारांवर बेट बांधण्यात येणार आहे. त्यापैकी गिरणापूलनजीक वाहतूक बेट मागील वर्षी बांधण्यात आले परंतु हे बेट बांधण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन यांचा ताळमेळ बसला नाही.