शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:45 IST

मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधत स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : शाळेसाठी आपला जीव धोक्यात घालत कधी पातेल्यातून, तर कधी आई-वडिलांच्या खांद्यावरून  प्रवास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासीबहुल पेठ तालुक्यातील कहांडोळपाडा येथील विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देत प्रशासनाला सूचना दिल्यानंतर काल या पुलाचे काम सुरू करण्यात आलं. मागील वर्षाच्या पावसाळ्यात कहांडोळ पाडा या आदिवासी भागातील विद्यार्थी शाळेत जाताना जीव धोक्यात घालत असल्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दृश्यांनी महाराष्ट्र हळहळला होता. याबाबतचे वृत्त पाहिल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधण्यास सुरुवात केली. तसंच नंतर गावकऱ्यांची मागणी प्रभावीपणे सरकारपर्यंत पोहोचवली आणि आता अखेर शाळकरी मुलांसाठी पूल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न सुटणार असल्याने गावकऱ्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचे पाहायला मिळाले. "आमच्या भागातील पुलाचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पण आता सरकारने लक्ष देऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही सरकारचे आभार मानतो," अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.

"पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार"

आदिवासी पाड्यातील पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर पाहणीसाठी आलेले विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले. "राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत. त्यानुसार हा पूल पूर्ण होईपर्यंत या कामाचा पाठपुरावा केला जाईल," असे चिवटे यांनी सांगितले.

दुसरीकडे, कहांडूळ पाडा येथील पुलाचे काम सुरू झाले असून या कामाचा पाठपुरावा थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होत असल्याने आम्ही विक्रमी वेळेत हा पूल बांधणार असल्याचा विश्वास कनिष्ठ अभियंता गणेश नाईक यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री