ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:15 IST2019-10-23T21:14:19+5:302019-10-23T21:15:56+5:30
पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.

पिंपळगाव बसवंत परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने डावण्या व द्राक्ष घड जिरल्याने द्राक्ष बाग जमीनदोस्त करतांना शेतकरी.
पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.
गेल्या चार पाच दिवसापासून कधी थंडी कधी ऊन तर कधी ढगाळ रोगट हवामान असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांवर डावण्या सारख्या रोगाचा प्रार्दुभाव दिसू लागला असून घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी द्राक्षबागांवर कुºहाड मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकरी सागर शिंदे यांनी एक एकर द्राक्ष बागेवर कुºहाड मारत द्राक्ष बाग जमीनदोस्त केली आहे.
दुसºया टप्यातील छाटणीच्या द्राक्षबागा तयार झाल्या आहेत. त्यामुळे अश्या वातावरणात किंचितही बेमोसमी पाऊस झाला तर डावण्या, भुरी व पोग्यात असलेले घड जिरण्याची चिंता निर्माण झाली आहे दुपारी आर्द्रता व सकाळी धुके तर पावसाची रिप रिप अशा स्थितीमध्ये डावणी रोगाने धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, मुखेड, बेहड, कारसूळ, लोनवाडी, दावचवाडी, अंतरवेली, पाचोरे, शिरवाडे वणी, उंबरखेड, नारायण टेंभी, पालखेड, रानवड, कसबे सुकेना, साकोरे, कोकणगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. सध्याच्या स्थितीत पोग्यात असलेल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणात घड जिरण्याचे प्रमाण व डावणीच्या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दररोजचे ढगाळ वातावरण व त्यात बेमोसमी पडणारा पाऊस त्यात सकाळी पडणारे दव यामुळे फवारणी करूनही दुसºया दिवशी रोग तसाच दिसतो.
आमच्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. झालेल्या नुकसानाला कंटाळून द्राक्ष बागेवर कुºहाड चालवावी लागली. परिणामी आतापर्यंत बागेवर केलेला लाखो रु पयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
- सागर शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.
बेमोसमी पावसामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याने द्राक्ष बागावर खर्च केलेले लाखो रु पये पाण्यात गेले आहे. प्रचंड नुकसान होऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आह.े
- उद्धराजे शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.