साकुरीत पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 00:49 IST2021-09-22T00:48:00+5:302021-09-22T00:49:39+5:30

मालेगाव तालुक्यातीळ साकुरीला आज मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदीला पुन्हा महापूर आला. गेल्या आठवड्यात आलेल्या पुराच्या संकटातून सावरत नाही. तेवढ्यात पुन्हा साकोरी गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी झाली. त्यातून गाव नदीला महापुराचे स्वरूप आले.

Cloudy rain again in Sakuri | साकुरीत पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस

मालेगाव तालुक्यातील साकुरीत पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पाणी साचून बुडालेले रोहित्र.

ठळक मुद्देगाव नदीला पुन्हा एकदा महापूर

शिवरोड (मालेगाव) : तालुक्यातीळ साकुरीला आज मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदीला पुन्हा महापूर आला. गेल्या आठवड्यात आलेल्या पुराच्या संकटातून सावरत नाही. तेवढ्यात पुन्हा साकोरी गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी झाली. त्यातून गाव नदीला महापुराचे स्वरूप आले. सगळीकडे पाणीच पाणी झाले. गाव, शेत, जमीन, रस्ते पाण्यात दिसेनासे झाले. प्रचंड प्रमाणात साकुरी परिसरात पावसाने थैमान घातले आहे. गावाजवळील स्मशानभूमी, नदी पार करण्याचा रस्ता, सभामंडप, शाळा सर्वत्र पाणी शिरले. गावातील बऱ्याच घरांमध्येसुद्धा पाणी साचलेले पाहायला मिळाले. एक आठवड्यापूर्वी आलेल्या पावसापेक्षाही प्रचंड पर्जन्यवृष्टी झाल्याने महापूर झाला. त्याचा परिणाम साकुरीसहित नदीचे पाणी पुढे जाणाऱ्या मुले पाथर्डी या गावांवर होणार आहे.

------------------

 

Web Title: Cloudy rain again in Sakuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.