ब्राह्मणगाव येथे चार दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:17 IST2020-09-07T21:15:56+5:302020-09-08T01:17:17+5:30
ब्राह्मणगाव : येथे गत आठवड्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सोमवार ते गुरु वार चार दिवस बंद पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मेडिकल, दूध व अत्यावश्यक सेवावगळता गावात सर्व व्यवहार बंद पाळण्यात आले आहेत.

सोमवारी दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याने ब्राह्मणगाव येथे सुनीसुनी असलेली बाजारपेठ.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणगाव : येथे गत आठवड्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सोमवार ते गुरु वार चार दिवस बंद पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मेडिकल, दूध व अत्यावश्यक सेवावगळता गावात सर्व व्यवहार बंद पाळण्यात आले आहेत.
मार्च महिन्यापासून गावात व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. वेळोवेळी आवश्यक जंतुनाशक फवारणीही करण्यात आली. आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मात्र, सद्यस्थितीत अनलॉक झाल्याने व प्रत्येक व्यक्ती पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याने कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे यांनी दिली.