शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

नाशकात शहरासह उपनगराच्याही सीमा बंद शहरासह उपनगरांच्याही सीमा बंद    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:50 IST

नाशिक शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही शुक्रवारी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून शहरातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सिडको, सातपूर, इंदिरानगर, वडळा, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, नांदूरनाका, आडगाव, पंचवटी, दिंडोरीरोड, गंगापूररोड, आनंदवल्ली , शिवाजीनगर, श्रमीकनगर परसिरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून उपनगरांच्याही सर्व सीमा बंद केल्या आहेत. 

ठळक मुद्देसंचारबंदीची अधिक सक्तीने अंमलबजावणीशहरातील उपनरांच्या सीमाही केल्या बंद

नाशिक : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरासह राज्यात आणि नाशिक जिल्हा व शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही शुक्रवारी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून शहरातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सिडको, सातपूर, इंदिरानगर, वडळा, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, नांदूरनाका, आडगाव, पंचवटी, दिंडोरीरोड, गंगापूररोड, आनंदवल्ली , शिवाजीनगर, श्रमीकनगर परसिरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून उपनगरांच्याही सर्व सीमा बंद केल्या आहेत. नाशिक शहरात अद्याप एकही रु ग्ण आढळून आलेला नसला तरी ग्रामीण भागात एक रु ग्ण आढळून आला असल्याने प्रशासनाने अधिक सतर्क होत संचारबंदी, साथरोग प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना आजार अधिक पसरू नये, यासाठी नागरिकांनी आपापल्या घरांमधून बाहेर पडणे टाळावे, विनाकारण जर कोणी घराबाहेर आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देताना पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनेही तीन महिन्यासाठी जप्त करण्याची कारवाई केली आहे. शहरात कोणीही परदेश दौरा करून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ  शहर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी शहरातील सिडको- उंटवाडी, अंबड- एक्लो पॉईंट-सातपूर-आयटीआय सिग्नल व सातपूर पोलीस ठाणे, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक-वडाळा -पाथर्डीरोड, नांदूरनाका-आडगाव भागात विविध ठिकाणी उपनगरांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या भागात दूध, भाजीपाला, औषधे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, नाकाबंदीवर तैनात पोलीसांकडून अशा सेवा देणाऱ्यांना सहकार्य करून जवळचा पर्यायी मार्ग दाखवून मदत केली जात आहे.  

वाहनांची कसून तपासणी संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी सवलत दिली जात असल्याने अनेक नागरिक औषधांची कारणे सांगून शहरातील रस्त्यांवर वाहने घेऊन येत असल्याने शहर पोलीसांकडून मुंबई नाका, द्वारका परिसरात वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरही पोलीसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकPoliceपोलिस