शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहकांच्या बँकेत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 17:20 IST

रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँके च्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या कष्टाची पुंजी परत मिळविण्यासाठी आपल्या लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या.

ठळक मुद्देपीएमबी को-ऑपरेटीव्ह बँकेवर आर्थिक निर्बँध खातेदारांना केवळ एक हजार रुपयेच काढता येणार

नाशिक : रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँके च्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या कष्टाची पुंजी परत मिळविण्यासाठी आपल्या लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. परंतु शाखा व्यवस्थापकांनी एका ग्राहकाला केवळ एक हजार रुपयेच देण्याची तयारी दर्शविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करीत आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा आग्रह धरल्याने बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (दि.२४) निर्बंध लादल्याने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बँकेच्या स्थितीची जबाबदारी स्वीकारत ग्राहकांना सहा महिन्यांत ही परिस्थिती सुधारण्याविषयी आश्वासित केले. मात्र त्याने ग्राहकांचे समाधान झाले नाही. उलट ग्राहकांमध्ये बँक बंद होणार, आपले पैसे बुडणार या भीतीने बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी करून शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाºयांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने बँक प्रशानाने पोलिसांना बोलविले असता पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले तरी ग्राहकांकडून बँकेत पैसे काढण्यासाठी रेटा सुरूच होता. दरम्यान, बँकेने रोख रकमेसोबतच इसीएस आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची प्रक्रियाही बंद केल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखीनत भर पडली आहे.  बँकेसोबतच स्वप्नांवरही निर्बंधनाशिकमधील अनेकांनी आपल्या घरासाठी, मुलांच्या लग्नासाठी, वाहन खरेदीसाठी पीएमसी बँकेत आपल्या आयुष्याची जमा पुंजी जमा केली होती. परंतु बँकेवर अचानक निर्बंध आल्याने या सर्वांचेच पैसे अडकले असून, बँकेसोबतच पैसे अडकलेल्या नाशिककरांच्या स्वप्नांवरही निर्बंध आले आहेत. अनेकांनी बँकेच्या अशा स्थितीमुळे आता तोंडावर आलेला दसरा-दिवाळीचा सण कसा साजरा करणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

टॅग्स :bankबँकNashikनाशिकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPoliceपोलिस