मानोरी : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने येवला तालुक्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचे स्रोत, ३८ गाव योजनेच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे.पावसाळा सुरू झाला असून, या दिवसात अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक व सत्यगाव येथील पाण्याच्या टाक्या, पाण्याचे स्रोत स्वच्छ करून गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार आहे.यावेळी सत्यगाव येथील सरपंच कमल भवर, उपसरपंच पांडुरंग दराडे, ग्रामसेवक साधना थोरात, ग्रामपंचायत सदस्य दत्तू दराडे उपस्थित होते.
येवल्यात पाणी टाक्यांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:57 IST