धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:12 PM2019-06-16T21:12:04+5:302019-06-16T21:15:52+5:30

लासलगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 Cleanliness campaign on behalf of Dharmadhikari Pratishthan | धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

Next
ठळक मुद्देकब्रस्थान, दफनभुमी, स्मशानभुमी स्वच्छता अभियान चालु आहे.

लासलगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
धर्माधिकारी प्रतिष्टानच्या वतीने ९ ते १६ जुन दरम्यान कब्रस्थान, दफनभुमी, स्मशानभुमी स्वच्छता अभियान चालु आहे.
लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या एकुण ९.५ टन कचरा संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात एकुण १५२ स्वंसेवकांनी सहभाग नोंदविला.
या वेळी पिंपळगाव नजिकच्या सरपंच मंदाबाई खुटे, विलास चव्हाण, चारूदत्त आढाव, उत्तम वाघ, जिजाबाई वाघ, जीवन पांगुळ, संजय महाले, भारती महाले, राजाराम घोडे, काशिनाथ खुटे, गोरख वडनेरे उपस्थित होते. सदर अभियानासाठी ग्रामपंचायत लासलगांव व पिंपळगांव, कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगांव यांनी ट्रॅक्टर व घंटागाडीची व्यवस्था केली होती.
 

Web Title:  Cleanliness campaign on behalf of Dharmadhikari Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य