‘रामशेज’च्या टाक्यांतील पाणी केले स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:36 IST2019-07-16T23:28:07+5:302019-07-17T00:36:57+5:30
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९०वी किल्ले रामशेज दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.१४) रोजी झाली. दिवसभरात श्रमदानातून रामशेजच्या माथ्यावरील टाक्यांतील गाळ, दगड, घाण काढून पाणी स्वच्छ करण्यात आले. तसेच किल्ल्यावरील एकूण सर्वच एतिहासिक वास्तूंचे मोजमाप करून त्यांचे डिजिटल स्केचेस, डॉक्युमेंटेशन करण्यात आले.

‘रामशेज’च्या टाक्यांतील पाणी केले स्वच्छ
नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९०वी किल्ले रामशेज दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.१४) रोजी झाली. दिवसभरात श्रमदानातून रामशेजच्या माथ्यावरील टाक्यांतील गाळ, दगड, घाण काढून पाणी स्वच्छ करण्यात आले. तसेच किल्ल्यावरील एकूण सर्वच एतिहासिक वास्तूंचे मोजमाप करून त्यांचे डिजिटल स्केचेस, डॉक्युमेंटेशन करण्यात आले.
किल्ले रामशेजच्या भग्न, दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यावरील तट, बुरु जे, पडके वाडे, दारू कोठार, सैनिकांचे जोते, चुन्याचा घाणा, यांची बिकट अवस्था झाली आाहे. यावेळी रामशेजच्या माथ्यावरील गाळाने, कचऱ्यात तुंबलेल्या टाक्यातील दगडे, गाळ काढण्यात आला. संस्थेच्या वतीने याठिकाणी दिवसभर श्रमदान करण्यात आले. तसेच यावेळी बैठकीत उपस्थित दुर्गसंवर्धकांनी आॅगस्ट महिन्यात किल्ले राजगड व तोरणा किल्ल्याची दुर्गदर्शन व स्वच्छता मोहीम करण्याचा निर्णय घेतला. रामशेजसह जिल्ह्यातील सर्वच किल्ल्यावर रविवारी व अन्य दिवशी चोख सुरक्षितता असावी, प्रत्येक पर्यटकांची नोंदणी करावी, किल्ल्याच्या पायथ्याला तपासणी नोंदणी चौकी नेमावी, आपत्ती व्यवस्थापन व गाइडचे शिक्षण स्थानिक तरु णांना द्यावे यासाठी प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी राम खुर्दळ, डॉ.अजय कापडणीस, अनुपजी गायकवाड, सल्लागार राजेंद्र कट्यारे, संदीप कांदे, नंदकुमार कापसे, योगेश अहिरे, भाऊसाहेब कुमावत, भाऊसाहेब चव्हाणके, डॉ. भरत ब्राह्मणे, बालनाथ जाधव आदी दुर्गसंवर्धक उपस्थित होते.
रामशेजच्या माथ्यावरील गाळाने, कचºयात तुंबलेल्या टाक्यातील दगडे, गाळ काढण्यात आला. संस्थेच्या वतीने याठिकाणी दिवसभर श्रमदान करण्यात आले.
४किल्ले रामशेजच्या भग्न, दुर्लक्षित एतिहासिक वास्तू, किल्ल्यावरील तट, बुरु जे, पडके वाडे, दारू कोठार, सैनिकांचे जोते, यांची बिकट अवस्था झाली आहे.