शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मिरजकरसह संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:40 IST

नाशिक : आर्थिक गुंतवणूक तसेच सोने तारणवर दरमहा जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले मिरजकर सराफचे संचालक महेश मिरजकर, कीर्ती हर्षल नाईक व अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी रविवारी (दि़५) एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, आतापर्यंत ...

ठळक मुद्देकारवाई : फसवणुकीची रक्कम अकरा कोटी

नाशिक : आर्थिक गुंतवणूक तसेच सोने तारणवर दरमहा जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले मिरजकर सराफचे संचालक महेश मिरजकर, कीर्ती हर्षल नाईक व अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी रविवारी (दि़५) एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, आतापर्यंत ४३३ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, मुख्य सूत्रधार व संचालक हर्षल नाईक हा फरार आहे़जुने नाशिकमधील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक महेश मिरजकर, हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले, श्रेयस आढाव, परिक्षित औरंगाबादकर, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती नाईक यांनी गुंतवणूकदारांना दरमहा एक ते दीडपट व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ मात्र, गुंतवणुकीवर परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी अ‍ॅड़ केंगे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ तेव्हापासून सराफी पेढीचे संचालक व कर्मचारी फरार झाले होते़सराफी पेढीतील फरार संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले असून, शनिवारी याबाबत अंतिम निर्णय होणार होता़ यासाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेले महेश मिरजकर, कीर्ती नाईक व प्राजक्ता कुलकर्णी हे शहरात आले असता त्यांचा माग काढून युनिट दोनच्या पथकाने दोन संशयितांना तपोवनातील संत जनार्दन स्वामी मठाजवळून तर एकास इंद्रकुंडावरून ताब्यात घेण्यात आले़ या तिघांनाही रविवारी (दि़५) जिल्हा न्यायालयात हजर केले असता ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या आशुतोष चंद्रात्रे याची पोलीस कोठडीही सोमवारी संपणार असून या चौघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे़आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४३३ तक्रारदारांनी तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम १० कोटी ८८ लाख ९२ हजार ५६२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे़ या तक्रारदाराच्या तक्रारीनुसार १८ किलो सोन्याची नोंद करण्यात आली आहे तर दिवसेंदिवस तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत चालली आहे़