शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शहरात पहाटे दोघे दुचाकीस्वार युवक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 14:48 IST

दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे.

नाशिक : शहरातील पाथर्डीफाटा-पाथर्डीगाव रस्त्यावर खड्डयाभोवती लावलेल्या संरक्षक बॅरिकेडला भरधाव वेगात धडकून पल्सरवरील दुचाकीस्वार युवक पहाटेच्या सुमारास ठार झाला. तसेच दुसऱ्या घटनेत सातपूर पोलीस ठाणे हद्दीत श्रमिकनगर भागात एका कारखान्याच्या संरक्षक भिंतीला लागून उभ्या असलेल्या आयशर मालवाहू ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

याबबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगर पोलीस पथक पाथर्डीफाटा ते पाथर्डीगावदरम्यानच्या मुख्य रस्त्यावरून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी अचानकपणे जोराचा आवाज आल्याने पथकाने त्यांचे वाहन त्या दिशेने वळविले असता. तेथे एका खड्याभोवती लावण्यास आलेल्या संरक्षक बॅरिकेडला धडकून दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत चेंबरच्या खड्डयात पडल्याचे आढळून आले. पोलीस अमजद पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने त्याला खड्डयातून बाहेर काढत तत्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दुचाकीस्वार विकास बबन आजबे (२४, रा. विराटनगर, सातपूर-अंबड लिंकरोड) असे मयताचे नाव आहे. याच्या ताब्यातील अपघातग्रस्त पल्सर दुचाकीची अद्याप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद झालेली नव्हती. त्यामुळे दुचाकीचा नोंदणी क्रमांक अस्तित्वात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.दुस-या घटनेत सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिकनगर येथे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एका आयशर ट्रकला भरधाव वेगात पल्सर दुचाकीस्वाराने (एम.एच १५ जीटी ४८५१) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागला व दुचाकी ट्रकच्या खाली गेली. गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयताचे नाव समजू शकले नाही.पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात दुचाकी चालविणे दोघा तरूणांच्या जीवावर बेतले असून दोघांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू