नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:01 PM2020-09-30T21:01:59+5:302020-10-01T01:47:38+5:30

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येणाऱ्या मर्यादा या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला किती आरक्षण मिळते आणि ते कितपत पुरवले जाते याकडे आता लक्ष लागून आहे.

The city of Nashik needs 500 gallons more water this year | नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी

नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेचा प्रस्ताव : गंगापूर धरण समूहात पुरेसा साठा नसल्याने साशंकता

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येणाऱ्या मर्यादा या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला किती आरक्षण मिळते आणि ते कितपत पुरवले जाते याकडे आता लक्ष लागून आहे.
महापालिकेला गंगापूर धरणाबरोबरच दारणा आणि मुकणे धरणातून पाणी पुरवले जाते. मात्र, दरवर्षी पाण्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे महापालिका आणि जलसंपदा विभागात काहीसे शीतयुद्ध रंगत असते. दरवर्षी पाणी आरक्षणाच्या बैठकीत नाशिक महपाालिकेच्या पाणीवापरावर जोरदार चर्चा होते आणि पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, मुळातच नाशिक ही पर्यटन नगरी होत असल्याने चाळीस ते पन्नास हजार तरंगती लोकसंख्या असल्याने पाण्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे असते. गेल्यावर्षी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. मात्र, पाच हजार २१४ दशलक्षघन फूट वापर झाला होता. यंदा नाशिक महापालिकेने १५ आॅक्टोबर ते ३१ जुलै २०२१ या कालावधीसाठी ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आरक्षणाची मागणी केली आहे. गेल्यावर्षी महापालिकेला गंगापूर धरणातून ३६०० दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले होते. प्रत्यक्षात पाण्याचा वापर ३ हजार ६४९ इतका झाला. दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले होते त्यात मल जल मिसळत असल्याने पावसाळ्याचे दोन महिने या पाण्याचा वापर करता आला नाही. त्यामुळे ३१९ दशलक्ष घनफूट इतकाच पाण्याचा वापर झाला तर मुकणे धरणातून एक हजार दशलक्षघन फूट आरक्षण मंजूर होते. प्रत्यक्षात १२४६ इतका वापर झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यंदा सहाशे दशलक्ष घनफूट ज्यादा पाणी आरक्षण मागितले आहे.

असे मागितले आरक्षण (दशलक्ष घनफूटमध्ये)
एकूण- ५६००
गंगापूर धरण समूह- ३८००
दारणा- ४००
मुकणे- १३००
----------------
गतवर्षीचा वापर
एकूण मंजूर आरक्षण- ५०००
गंगापूर- ३६००
दारणा- ४००
मुकणे- १०००
----------------
गंगापूर धरणाएवढे हवे आरक्षण
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाची क्षमता ७२०० दक्षलक्ष घनफूट इतकी होती. मात्र गाळ साचल्याने या धरणाची क्षमता ५६०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. महापालिकेने यंदा ५६०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षण मागितले असून, ते गंगापूर धरणाच्या साठवण क्षमतेइतके आहे.

 

Web Title: The city of Nashik needs 500 gallons more water this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.