नाशिक  शहरात मंगळसूत्र खेचण्याबरोबरच युवकाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:04 IST2018-10-23T23:56:00+5:302018-10-24T00:04:54+5:30

शहरात जबरी लूट, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत़ आडगाव शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व घारपुरे घाटाजवळ तरुणाची दुचाकीवरील संशयितांनी केलेली जबरी लूट या दोन घटना सोमवारी (दि़२२) घडल्या आहेत़

In the city of Nashik, besides the mangalosutra pulling, youth looted | नाशिक  शहरात मंगळसूत्र खेचण्याबरोबरच युवकाची लूट

नाशिक  शहरात मंगळसूत्र खेचण्याबरोबरच युवकाची लूट

नाशिक : शहरात जबरी लूट, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत़ आडगाव शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व घारपुरे घाटाजवळ तरुणाची दुचाकीवरील संशयितांनी केलेली जबरी लूट या दोन घटना सोमवारी (दि़२२) घडल्या आहेत़  आडगाव शिवारातील शरयू पार्कजवळील पल्लवी रो-हाउसमधील रहिवासी प्रतिभा चौधरी या दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास कापडणीस यांच्या बंगल्याजवळून पायी जात होत्या़ यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मोबाइल व रोख रक्कम लुटली  दुसरी लुटीची घटना ९ आॅक्टोबर रोजी घारपुरे घाटाजवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ घडली़ नासिक्लबजवळील बजरंगवाडीतील रहिवासी अरविंद पांडे (१९) हा युवक दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पायी जात होता. यावेळी लाल रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५, ९३७४) दुचाकीवरून संशयित महेश जाधव व त्याचे दोन साथीदार आले. यातील दोघा संशयितांनी पांडे यास शिवीगाळ करीत धरून ठेवले तर उर्वरित एकाने खिशातील लिनोव्हो के नोट मोबाइल व पाकिटातून दहा हजार रुपये असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला़ या प्रकरणी पांडे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: In the city of Nashik, besides the mangalosutra pulling, youth looted