सिटी लिंकचे वाहक सोमवार पासून बेमुदत संपावर, मनसे प्रणित सेनेची नोटीस

By संजय पाठक | Updated: July 11, 2024 16:46 IST2024-07-11T16:46:29+5:302024-07-11T16:46:44+5:30

आता हा ठेकेदार बाहेर पडत नाही तोच मनसेप्रणीत कामगार सेनेने येत्या शनिवारपासून (दि.१३) संपाचा इशारा दिला आहे.

City Link carriers on indefinite strike from Monday, MNS Pranit Sena notice | सिटी लिंकचे वाहक सोमवार पासून बेमुदत संपावर, मनसे प्रणित सेनेची नोटीस

सिटी लिंकचे वाहक सोमवार पासून बेमुदत संपावर, मनसे प्रणित सेनेची नोटीस

नाशिक : सिटी लिंक बस सेवा सुरू झाल्यापासून लागलेले कर्मचाऱ्यांच्या संपाचे ग्रहण कायम आहे. यापूर्वीच्या ठेकेदाराकडील चालकांनी वेतन वेळेवर मिळत नाही आणि अन्य मागण्यांसाठी तब्बल ९ वेळा संप केला. आता हा ठेकेदार बाहेर पडत नाही तोच मनसेप्रणीत कामगार सेनेने येत्या शनिवारपासून (दि.१३) संपाचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेसाठी बस ठेकेदाराचेच चालक आहेत,
मुळ पगारात वाढ करावी म्हणजेच दर महामार्ग बारा हजार रुपये वाढवून द्यावे, प्रोत्साहन भत्ता ७०० रुपये आहे तो १४०० रुपये करावा, तपोवन डेपो आणि नाशिकरोड येथील बस चालकांच्या वेतनात समानता असावी, या मागण्या मान्य न केल्यास १३ जुलैपासून बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष अंकुश पवार यांनी नोटिसीत दिला आहे.

Web Title: City Link carriers on indefinite strike from Monday, MNS Pranit Sena notice

टॅग्स :Nashikनाशिक