शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पुन्हा ‘चिवचिवाट’

By admin | Updated: March 20, 2015 00:05 IST

जागतिक चिमणी दिन : जनजागृतीमुळे चिमणी संवर्धनाबाबत नाशिककरांचा वाढता पुढाकार

नाशिक : या चिमण्यांनो परत फिरा रे... असे मराठी गीत चिमण्यांच्या घटत्या संख्येवरून रचण्यात आले आहे; मात्र गेल्या दोन वर्षांपासून शहरात चिमणी संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, शहरातील विविध इमारतींमध्ये तसेच बंगल्यांच्या परिसरातील उद्यानातील वृक्षांवर कृत्रिम घरटे नागरिकांकडून लावले जात आहेत. तसेच मातीच्या पात्रात पाणीदेखील नागरिक ठेवू लागल्याने शहर व परिसरात पुन्हा चिऊताईचा चिवचिवाट कानी पडू लागला आहे. अशोकस्तंभासारख्या गजबजलेल्या ठिकाणीसुद्धा शेकडो चिमण्या ‘दर्शन’ देत आहेत.चिमण्यांच्या घटत्या संख्येमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना बहुतांश संस्था तसेच पक्षिपे्रमींकडून चिमणी संवर्धनासाठी जनजागृतीवर भर देण्यास प्रारंभ केला. चिमणी पक्ष्याविषयीची माहिती देत शहरातील काही पक्षिप्रेमींनी लाकडी कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप करण्यास सुरुवात केली. नागरिकांमध्येही चिमण्यांविषयीचे प्रेम वाढीस लागले. काठे गल्लीत तर ‘आस्था’ नावाच्या इमारतीमध्ये शेकडो चिमण्या कृत्रिम घरट्यांमध्ये तसेच येथील मोकळ्या भूखंडावरील बाभळीच्या वृक्षावर वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळतात. एकूणच नाशिककरांकडून चिमण्यांच्या बाबतीत दाखविल्या जाणाऱ्या प्रेमापोटी चिऊताईलाही शहराच्या लोकवस्तीचा लळा लागला आहे. अशोकस्तंभावरील एका चहाविक्रेत्याने धान्य व बिस्कि टांचे खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देत शेकडो चिमण्यांना आपलेसे केले आहे. येथील उंबर, बाभूळ, चेरीची वृक्ष जणू चिमण्यांचे हक्काचं वस्तिस्थानच बनले आहे. या ठिकाणी शेकडो चिमण्या दिवसभर वर्दळ असतानादेखील पहावयास मिळतात. तसेच आनंदवली शिवारासह, उपनगर, इंदिरानगर, टाकळी फाटा, गंगापूररोड आदि परिसरातदेखील कृत्रिम अन्नपात्र, जलपात्र, घरटे नागरिकांनी घरांच्या खिडक्यांमध्ये तसेच बाल्कनीत लावलेले दिसतात. चिमणी संवर्धनासाठी शहराच्या मुख्य टपाल कार्यालयानेही पाऊल टाकले असून, येथील प्रवेशद्वारावर असलेल्या वृक्षांच्या छायेखाली उद्याननिर्मिती करण्याबरोबरच वृक्षांवर चिमण्यांसाठी कृत्रिम अन्नपात्र व घरटेदेखील लावली आहेत. एकूणच नाशिककरांच्या अशा एकत्रित पुढाकाराने गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये शहराच्या लोकवस्तींमध्ये सकाळ-संध्याकाळ चिमण्यांचा थवा विहार करताना पहावयास मिळतो.