Citizens have been caught following chainsaw thieves | सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले

सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले

ठळक मुद्देनागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले

नाशिक : कुणालनगर येथून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील संशयितास परिसरातील नागरिकांनी पकडून आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केल़े संतोष प्रकाश खैरनार असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणार्कनगर येथील रहिवासी वर्षा संतोष कोठुळे या सोमवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास श्रीरामनगर येथील शाळेतून मुलाला आणण्यासाठी गेल्या होत्या़ मुलाला शाळेतून घेतल्यानंतर त्या घराकडे पायी जात असताना संशयित खैरनार याने त्यांच्या पाठीमागे येऊन गळ्यातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी ओढून पळ काढला.

या घटनेनंतर वर्षा कोठुळे यांच्यासह शाळेजवळील काही महिलांनी आरडाओरड केल्यावर नागरिकांनी संशयिताचा पाठलाग करून त्यास पकडले. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व खैरनार यास अटक केली़ दरम्यान, संशयित खैरनार याच्याकडून सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

Web Title:  Citizens have been caught following chainsaw thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.