शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

नागरिक भयमुक्त : अवघे चार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 6:14 PM

त्र्यंबकेश्वर : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तालुक्यात केवळ चार रुग्ण बाधित असल्याने येत्या २/३ दिवसात त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना ...

ठळक मुद्देत्र्यंबकला तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर

त्र्यंबकेश्वर : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तालुक्यात केवळ चार रुग्ण बाधित असल्याने येत्या २/३ दिवसात त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना मुक्तीच्या वाटेवर असल्याचे पंचायत समितीच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार त्र्यंबक तालुक्यात आतापर्यंत ५३८ रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यापैकी त्र्यंबकेश्वर शहरात १८७ तर जिल्हा परिषद हद्दीत ३५१ मिळून ५३८ रुग्ण पॉझिटिव्ह होते. यापैकी ५०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १ तर होम आयसोलेटेड २ असे चारच ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शाळा सुरु होत असल्याने आतापर्यंत टप्प्याटप्प्याने शिक्षकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. त्यातील बहुतेक जणांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. सध्या ३० शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे सर्व शिक्षक आजारी किंवा संशयित रुग्ण नसून वर्गांवर पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे हा उद्देश तालुका शिक्षण विभागाचा व आरोग्य विभागाचा असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट व आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी दिली. कोविड -१९ आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. पाटील व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.कोरोना गो !उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी किरण जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. बर्वे , तालुका वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी डॉ. रेखा सोनवणे सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी ह्यकोरोना गोह्ण असा व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर कोरोना अपडेट टाकले जात असून त्या माध्यमातून तालुक्यातील ॲक्टिव रुग्णांची काळजी घेता येत होती. तसेच तालुक्यासह शहरात प्रशासनाला खबरदारी घेऊन उपाययोजना करता येत होत्या.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य