सिडकोत तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:21 IST2019-01-14T01:20:57+5:302019-01-14T01:21:43+5:30

सिडकोतील डीजीपीनगरजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने पंख्याला ओढणी बांधून स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

CIDCOOT woman commits suicide | सिडकोत तरुणाची आत्महत्या

सिडकोत तरुणाची आत्महत्या

नाशिक : सिडकोतील डीजीपीनगरजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने पंख्याला ओढणी बांधून स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हर्षल प्रवीणचंद संचेती (३०) असे या तरुणाचे नाव आहे. हर्षल संचेती यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला होता, त्यामुळे झालेल्या कर्जामुळे ते तणावाखाली होते. कर्जामुळे खचून जाऊन हर्षल यांनी घरी हॉलमधील पंख्याला ओढणीने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत सागर जाधव यांनी अंबड पोलिसांना माहिती कळविली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: CIDCOOT woman commits suicide