सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:10 PM2018-07-31T23:10:25+5:302018-08-01T00:15:35+5:30

नाशिक पश्चिम विधानसभा कार्यक्षेत्रासाठी मिळकत नोंदणी कार्यालय मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे.

 CIDCO approved stamp duty office | सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर

सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर

Next

सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा कार्यक्षेत्रासाठी मिळकत नोंदणी कार्यालय मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे.  नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको, कामटवाडे, इंदिरानगर, पाथर्डी, चुंचाळे हा परिसर नव्याने विकसित होत आहे. नागरिकांना व बांधकाम व्यावसायिकांना घरांच्या व प्लॉट खरेदी नोंदणीसाठी नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य नोंदणी कार्यालयात जावे लागते. सिडको परिसरातच नोंदणी कार्यालय सुरू करण्यात यावे यासाठी आमदार सीमा हिरे यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्याकडे याबाबतचे निवेदन देऊन मागणी केली होती. त्यामागणीच्या अनुषंगाने नोंदणी कार्यालयाचे उपकार्यालय जय प्लाझा, अंबड पोलीस स्टेशनजवळ मंजूर करण्यात आले असून त्याचे काम सुरू आहे. नोंदणी कार्यालयाचे उपकार्यालय मंजूर झाल्याने आता सिडको, कामटवाडे, इंदिरानगर, पाथर्डी, चुंचाळे या परिसरातील नागरिकांची व व्यावसायिकांची गैरसोय टळणार असल्याचे हिरे यांनी दिली.

Web Title:  CIDCO approved stamp duty office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.