शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नाताळ सणास उत्साहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:48 PM

शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनमाड : शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  विविध चर्चमध्ये आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री संत बार्णबा चर्च, बेथेल चर्च, सेव्हथ-डे अ‍ॅडव्होटिस्ट चर्च आदी विविध चर्चमध्ये नाताळनिमित्त प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले. परिसरात ख्रिश्चन बांधव आबालवृद्ध महिला मोठ्या संख्येने नवे कपडे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.नाताळनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक, रोषणाई भव्य स्टार, नाताळ शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चमध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना, बार्णबा चर्चमध्ये संत बार्णबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कॅम्प येथे दरवर्षीप्रमाणे भव्य स्टार उभारण्यात आला आहे.  नाताळ व नवर्षीनिमित्त पुर्व संध्या बप्तीसे, निराधार विधवांना साडीवाटप, संदेश भक्ती, पवित्र सहभागीता, वृक्षारोपण कॅण्डल सर्व्हिस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  यावेळी रेव्ह. आर.पी. घुले, अशोक पाटोळे, शमुवेल कुबेरजी, अतुल सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र सहभागिता करण्यात आली. डी. डी. शेलार, दिलीप सूर्यवंशी, डेव्हीड नगालीकर, अविनाश सूर्यवंशी, विजयानंद अस्वले, मोनिका कुबेरजी, माणीक जाधव, सतीश सूर्यवंशी, स्मिता खडांगळे यांच्यासह चर्च कमिटी सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

टॅग्स :NashikनाशिकChrismasख्रिसमस