चिंकाराची शिकार,सटाण्यात तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:49 IST2018-11-12T17:48:45+5:302018-11-12T17:49:17+5:30
बागलाण तालुक्यातील मळगाव भामेर येथील पोहाणे शिवारात सोमवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा या नर जातीच्या हरणाची शिकार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने सापळा रचून तीन जणांना अटक केली, तर सात जण दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

चिंकाराची शिकार,सटाण्यात तिघांना अटक
सटाणा : बागलाण तालुक्यातील मळगाव भामेर येथील पोहाणे शिवारात सोमवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा या नर जातीच्या हरणाची शिकार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने सापळा रचून तीन जणांना अटक केली, तर सात जण दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. हे शिकारी तब्बल वर्षभरापासून येथील हरणांवर पाळत ठेऊन होते.
या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिभाऊ तुळशीराम अहिरे (५७), शैलेश सोन्या बागुल (२२) रा. करंजटी ता. अहवा जि.डांग (गुजरात), तुळशीराम सखाराम पवार (३०) रा. करंजटी ता. अहवा जि. डांग (गुजरात) यांना अटक केली असून, परवीश मंगा चौधरी, सुरेश मुरली वारळी, पिंट्या मगन वारळी, धर्मेश आडगू, शिवमन उमेश वारळी, ईश्वर गंगाराम गावित, आश्विन गंगाराम गावित (सर्व, रा. कंरजटी ता. अहवा जि. डांग, गुजरात) हे सर्व फरार आहेत.