शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

खडकाळ माळरानावर  चायना काकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:27 AM

खडकाळ माळरानावरील जमिनीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत  बी. ई. मॅकेनिकलच्या तरुणाने शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती फुलवत  आर्थिक व्यवहाराची घडी बसविली आहे. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील योगेश पांडुरंग जेजुरकर यांनी नायगाव खोयातील  तरुणांना नवशेतीचा मूलमंत्रच दिला आहे.

ठळक मुद्दे शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती चायना काकडीला वीस किलोच्या क्रे टला ४०० ते ५०० रुपये भाव खडकाळ जमीन माती टाकून सपाट केली.

दत्ता दिघोळेखडकाळ माळरानावरील जमिनीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत  बी. ई. मॅकेनिकलच्या तरुणाने शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती फुलवत  आर्थिक व्यवहाराची घडी बसविली आहे. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील योगेश पांडुरंग जेजुरकर यांनी नायगाव खोयातील  तरुणांना नवशेतीचा मूलमंत्रच दिला आहे.  सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील गोदा-दारणेच्या संगमावर वसलेले जोगलटेंभी हे गाव. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांतून मार्गक्रमण करणे नित्याचे झाल्याने येथील शेतकरी हतबल झाला आहे. अशी परिस्थिती असताना नाशिक  शहरात बालपण गेलेल्या योगेश जेजुरकर या बी.ई. मॅकेनिकल झालेल्या तरुणाने २०१४ मध्ये चाकण ( पुणे ) येथील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. जोगलटेंभी-सोनगिरी रस्त्यावरील माळरानावर शेतजमीन खरेदी  करून खडकाळ जमीन माती टाकून सपाट केली.  योगेशने वडील रमेश जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात मुबलक पाणी असताना पारंपरिक पिके न घेण्याचा निर्णय घेतला. जेजुरकर यांनी या माळरानावर ३० गुंठे क्षेत्रात पॉलिहाउस उभारून चायना काकडीची लागवड केली, तर दुसºया पॉलिहाउसमध्ये गुलाबाची लागवड करत ठिबक सिंचनपद्धतीचा वापर केला. गेल्या काही दिवसांपासून गुलाब व चायना काकडीपासून महिन्याला दोन ते तीन लाखांचे उत्पन्न जेजुरकर यांना मिळू लागले आहे. नोटाबंदीपासून गुलाबाचे दर कोसळल्याने नफ्यात घट येत असल्याचेही ते सांगतात. सध्या चायना काकडीला वीस किलोच्या क्रे टला ४०० ते ५०० रुपये असा भाव मिळत असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. हे काकडी पीक अजून दोन महिने भरघोस उत्पादन देईल, असा विश्वास योगेश यांना वाटतो. नायगाव खोºयात प्रथमच न्चायना काकडीचे पीक घेतले आहे. यशस्वी व वेगळे उत्पादन बघण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी जेजुरकर यांच्या शेतावर भेट देण्यासाठी येऊन माहिती जाणून घेत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी