पिंपळगावी सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:04 IST2018-10-30T17:04:21+5:302018-10-30T17:04:34+5:30
हनुमान नगर येथील दुदैवी घटना

पिंपळगावी सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातील हनुमान नगर येथील मुलीला सर्प दंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी (दि.२९) घडली. भाग्यश्री रमेश रोकडे (वय ३) असे या मुलीचे नाव आहे.
भाग्यश्री रमेश रोकडे हि तीन वर्षाची चिमुरडी सायंकाळच्या दरम्यान आपल्या हनुमान नगर येथील राहत्या घराबाहेर अंगणातील ओट्यावर बसलली असतांना कोब्रा जातीच्या सर्पाने तिला दोनदा दंश केला. दरम्यान या प्रकाराबाबत काय झाले हे कोणाला कळले नाही. मुलगी रडत असल्याचे बघितल्यावर आई वडिलांनी तिला खेळताना काही तरी लागले असावे, म्हणून तिच्या पायाला लागलेल्या ठिकाणी कपडयाने बांधले. परंतु काही वेळा नंतर त्या चिमुरडीने उलटी केली व तिच्या तोंडात फेस येण्यास सुरवात झाली. त्यावेळी मुलीला सर्प दंश झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. घाबरलेल्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले परंतु रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. याबत पिंपळगाव पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे