आईकडून मुलाचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:51 IST2019-05-09T00:50:36+5:302019-05-09T00:51:07+5:30

मालेगाव : शहरात संपत्तीच्या वादातुन मुलाचा विश्वासघात केल्या प्रकरणी आई विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Child's betrayal | आईकडून मुलाचा विश्वासघात

आईकडून मुलाचा विश्वासघात

ठळक मुद्दे४४ हजार ८०० रुपये बेकायदा वसुल केले.



मालेगाव : शहरात संपत्तीच्या वादातुन मुलाचा विश्वासघात केल्या प्रकरणी आई विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. येथील अब्दुल्ला नगर भागातील मुर्तुझा उस्मान गणी यांच्या वडीलांची मिळकत आई सोगरा उस्मान गणी (८०) यांनी तिघांसह संगनमत करुन कुठलाही प्रकारची संमती न घेता २५ यंत्रमागाची खोटी व बनावट नोटरीदस्त स्वत:च्या नावाने करुन मुलाची फसवणूक व विश्वासघात केला. तसेच वडीलांच्या मिळकतीतील तीन तोळे सोन्याचे दागिणे व २९ यंत्रमागाच्या चार वर्षाच्या भाडे पोटी ४४ हजार ८०० रुपये बेकायदा वसुल केले. या प्रकरणी मुलगा मुर्तुझा याच्या तक्रारीवरुन आई विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरुन विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Child's betrayal