शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

बालपणापासूनच धर्मसंस्काराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:06 IST

जीवनात ज्ञानाशिवाय चिंतन नाही, प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आधी त्याची ज्ञानप्राप्ती असावी लागते तसेच परमेश्वर समजून घेण्यासाठी त्याविषयाचे ज्ञान आवश्यकच आहे. आजच्या काळात वाढता हिंसाचार, अत्याचार, भ्रष्टाचार आणि वाईट व्यवहार यांचे प्रमाण वाढले असून, माणूस सद्विचार व सद्धर्मापासून दूर जात आहे. अशा युगात बालपणापासूनच धर्म संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री आचार्यप्रवर महंत साळकरबाबा (धुळे) यांनी केले.

नाशिक : जीवनात ज्ञानाशिवाय चिंतन नाही, प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आधी त्याची ज्ञानप्राप्ती असावी लागते तसेच परमेश्वर समजून घेण्यासाठी त्याविषयाचे ज्ञान आवश्यकच आहे. आजच्या काळात वाढता हिंसाचार, अत्याचार, भ्रष्टाचार आणि वाईट व्यवहार यांचे प्रमाण वाढले असून, माणूस सद्विचार व सद्धर्मापासून दूर जात आहे. अशा युगात बालपणापासूनच धर्म संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री आचार्यप्रवर महंत साळकरबाबा (धुळे) यांनी केले. पिंपळनारे (चाय चांदवड) येथे बुधवारी (दि. २३) भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवानिमित्त आयोजित धर्मसभेत साळकर बाबा बोलत होते. याप्रसंगी महंत साळकर बाबा म्हणाले की, भक्तिमार्गात साधनांची आवश्यकता असून, परमेश्वर भेट हे साध्य आहे. परंतू गुरुलाच परमेश्वर मानू नका. गुरु हा परमेश्वराचा मार्ग दाखविणारा साधक आहे.व्यासपीठावर महंत मयंकराज बाबा, अचलपूरक बाबा, कृष्णराज बाबा, सुभद्राबाई लोणकर, महंत वाल्हेरान बाबा, बाळकृष्ण सुकेणेकर, सायराज बाबा लोणारकर, गोपीनाराजशास्त्री सुकेणेकर, राजधरदादा सुकेणेकर आदिंसह संतमहंत उपस्थित होते. तरडगाव (जि. सातारा) आश्रमाचे संचालक सुरेशराज राहेरकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, परमेश्वराशी संवाद करावयाचे असेल तर समाजाच्या गोंगाटापासून दूर एकांतात जावे लागते. महानुभाव पंथांचा प्रवास हा एकांताकडून लोकांताकडे म्हणजे समाजाच्या अंतीम घटकाकडे झालेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार श्रीचक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकात मांडला. सर्वसमावेश असेलेले पंथाचे तत्वज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकसंवाद निर्माण व्हायला हवा असेही ते म्हणाले. औरंगाबाद येथील महानुभाव मासिकाचे संपादक संतोषमुनी कपाटेशास्त्री म्हणाले की, जीवनात दृढ संकल्प केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. ऐहिक सुखाच्या मागे धावताना मनुष्य जीवनातील सुखशांती हरवली असून अध्यात्मातूनच आपले जीवन सुसंस्कारी आणि शांतीमय होऊ शकते. आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा शास्त्री यांनी समारोपप्रसंगी गेल्या पाच दशकापसून सुरू असलेल्या श्रीचक्रधर जयंती महोत्सव सोहळ्याचा आढावा घेऊन पुढील सुवर्णमहोत्सवी जयंती महोत्सव चांदोरी (ता. निफाड) येथे होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप पिंपळनारेच्या सरपंच मंदाकिनी कोठुळे, प्रा. सोमनाथ फुगट यांनीही विचार मांडले, धर्मसभेच्या प्रारंभी अखिल भारतीय महानुभाव समितीचे जिल्हाध्यक्ष वामनराव आवारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमास जिल्हापरिषद अध्यक्ष शितल सांगळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश डोखले, डॉ. किरण मोगल, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक प्रकाश घुगे, महानुभाव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्र्रकाश नन्नावरे, महेंद्रसिंग परदेशी, बाळासाहेब माळी, दत्तात्रय माळी, पिंपळनारेच्या सरपंच मंदाकिनी कोठुळे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, मुख्याध्यापक राजेंद्र निकम, अ‍ॅड. पांडुरंग बोधले, प्रभाकर कातकाडे, सुधाकर भंडारे, बाळासाहेब टर्ले, पोपटराव गायकवाड, अनिल कोठुळे, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.