विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:27 IST2020-09-14T22:50:21+5:302020-09-15T01:27:05+5:30
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या भदर गावातील हितेश माधव वाघ (८) या बालकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.

विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या भदर गावातील हितेश माधव वाघ (८) या बालकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. जिल्हा परिषद शाळेतील दुसरीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी हितेश हा १३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान प्रांगणात गोट्या खेळत असतांना त्याची गोटी विद्युत खांबा जवळ गेली. ती गोटी उचलायला गेला असता विजेच्या खांबात उतरलेल्या विद्युतप्रवाहचा जोरदार झटका डाव्या पायास बसल्याने जागीच बेशुद्ध पडला. त्यास भाऊ दिनेश व वडील माधव यांनी ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले. मात्र तपासणी नंतर तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश पांडुळे यांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले.