खडकमाळेगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 15:11 IST2020-03-03T15:11:02+5:302020-03-03T15:11:39+5:30

लासलगाव : परिसरातील खडकमाळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात बालकांनी विविध खेळाच्या साधनांचा उपभोग घेत आपला आनंद द्विगुणित केला.

 Child Anand Melava cheers at Khadakmalegaon Zilla Parishad School | खडकमाळेगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

खडकमाळेगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

पंचायत समिती उपसभापती शिवा सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात विविध उपक्र म राबविण्यात आले. मेळाव्यात मांडण्यात आलेल्या २५ स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांनी नाविन्यपूर्ण पाककृतींचा आस्वाद घेतला. शालेय विद्यार्थी निर्मित विविध हस्तलिखित व कविता पुस्तिकांचे प्रकाशन सुरासे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक रविंद्र लचके यांच्या हस्ते संकलित शिवचरित्र चित्र दालनाचे अनावरण करण्यात आले. विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रयोग कृती पाहून सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी दत्ता रायते, राजेंद्र रायते, नामदेव राजोळे, पंढरीनाथ रायते, निवृत्ती शिंदे, प्रशांत महाराज, योगेश चोथे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब रायते, सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र भोसले, विक्र म रायते, चिंतामण रायते, रवींद्र रायते व इतर मान्यवर उपस्थित होते. संदिप भाबड यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक लचके यांनी आभार मानले.

Web Title:  Child Anand Melava cheers at Khadakmalegaon Zilla Parishad School