डोंगरगाव येथून मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:28 IST2019-06-19T01:27:47+5:302019-06-19T01:28:03+5:30
डोंगरगाव येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली असल्याची माहिती लासलगाव पोलिसांकडून देण्यात आली आहे.

डोंगरगाव येथून मुलीचे अपहरण
लासलगाव : डोंगरगाव येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली असल्याची माहिती लासलगाव पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चिन्ना बसवैया व्यंकटेश किन्नरा हे मूळचे तेलंगणा राज्यातील असून, ते सध्या डोंगरगाव येथे जडीबुटीचा व्यवसाय करतात. त्यांची सोळा वर्षीय मुलगी दि. ८ जून रोजी रात्री ९ ते १ वाजेच्या दरम्यान डोंगरगावरोड पालखेड कालव्यालगतच्या रस्त्यावरून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात भादविी कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.