मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नाशिकच्या पोलीस अकादमीत आज विविध विकास कामांचे उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 10:56 IST2021-08-09T10:53:52+5:302021-08-09T10:56:05+5:30
Uddhav Thackeray : नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विविध विकास कामांचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी होणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नाशिकच्या पोलीस अकादमीत आज विविध विकास कामांचे उदघाटन
नाशिक- येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विविध विकास कामांचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी होणार आहे. अकादमीत दुपारी दीड वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबकरोड वरील तब्बल शंभर एकर जागेत असलेल्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते अकादमीला सक्षम करण्यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत याअंतर्गत कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, हॉकी मैदान तसेच व्हॉलीबॉल आणि बास्केट बॉल मैदान निसर्ग उद्यान असे विविध कामे करण्यात आली आहेत. त्याचे उदघाटन मुख्यमंत्री करणार आहेत.