मुख्यमंत्री ठाकरे आज नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:21 IST2020-01-29T23:42:28+5:302020-01-30T00:21:37+5:30
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्री गुरुवारी (दि. ३०) नाशिकमध्ये येत आहेत. नाशिकसह धुळे, नंदुबार, जळगाव आणि ...

मुख्यमंत्री ठाकरे आज नाशकात
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्री गुरुवारी (दि. ३०) नाशिकमध्ये येत आहेत. नाशिकसह धुळे, नंदुबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांमधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित उपयोजनेंतर्गत असलेल्या कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. विभागातील घरकुल, पेयजल, पाणीपुरवठा, रस्ते, सिंचन सुविधा आदींची माहिती ते घेणार आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा नाशिकमध्ये येत आहेत.