अवकाळीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर
By संदीप भालेराव | Updated: April 10, 2023 14:25 IST2023-04-10T14:24:57+5:302023-04-10T14:25:06+5:30
शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.

अवकाळीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर
नाशिक: बहुचर्चित आयोद्धा दौरा करून मुंबईत परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (दि.१०) तातडीने नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या परस्थितीची पाहाणी करण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी जिल्ह्यात झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास दहा तालुक्यांमधील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सटाणा तालुक्यातील काही गावांना ते भेट देणार असून मुंबईतून थेट हेलिकॉप्टरने ते सटाणा येथे पोहचत आहेत. दुपारी राजभवन येथून ते हेलिकॉपटरने तातडीने नाशिकमध्ये पोहचत आहेत.