शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बदलीने अन्य अधिका-यांना चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:16 PM

जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासूनच मीना यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, प्रारंभी ह्या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीना यांनी आमदार व खासदारांनाही त्याच

ठळक मुद्देजिल्ह्यातील कामचुकार अधिका-यांना मोठा धडाच मिळाला मीना यांनी त्याचेही राजकारण करीत आपला कामचुकारपणा झाकण्याचा प्रयत्न

नाशिक : मनमानीपणे शासकीय कामकाज करून पदाचा दुरूपयोग करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींचा अपमर्द व सह अधिका-यांच्या अपमानात धन्यता मानणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने जिल्ह्यातील कामचुकार अधिका-यांना मोठा धडाच मिळाला असून, मीना प्रकरणात लोकप्रतिनिधींनी दाखविलेली एकजुटच कामी आल्याने नजिकच्या काळात सनदी अधिका-यांकडून लोकप्रतिनिधींना मानसन्मानाची वागणूक मिळण्याची अपेक्षा त्यानिमित्ताने बळावली आहे.जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासूनच मीना यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, प्रारंभी ह्या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीना यांनी आमदार व खासदारांनाही त्याच तराजूत तोलण्यास सुरूवात केल्याने त्यातून आमदार अनिल कदम यांच्याशी त्यांची हुज्जतही झाली होती. लोकप्रतिनिधींना कस्पटासमान संबोधणा-या मीना यांनी आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचा-यांनाही तुच्छतेची वागणूक देण्यास सुरूवात केल्यामुळे त्याचा परिणाम संपुर्ण जिल्हा परिषदेच्या व पर्यायाने ग्रामीण विकासाच्या कामावर झाला. गेल्या सहा महिन्यांपासून मीना यांचा वारू बेफाम उधळत असताना तत्कालीन विभागीय आयुक्तांनीही त्यांच्या या कृत्याकडे दुर्लक्षाची भुमिका घेतली मात्र महेश झगडे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर मात्र मीना यांच्या कार्यक्षमतेची ख-या अर्थाने कसोटी लागली. कुपोषणासारख्याअतिशय संवेदनशील असलेल्या विषयाप्रती मीना यांची असलेली उदासिनता, ग्रामपंचायतींची व आदिवासी विकास विभागाच्या कामांचा झालेला खेळखंडोबा झगडे यांनी गांभीर्याने घेत अगोदर मीना यांना कार्यपद्धती दुरूस्त करण्याची पुरेपूर संधी दिली परंतु मीना यांनी त्याचेही राजकारण करीत आपला कामचुकारपणा झाकण्याचा प्रयत्न केला.मीना यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक व अधिका-यांनीही असहकाराचे अस्त्र उपसले तर लोकप्रतिनिधींनीही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागल्याने मीना यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारे आरएएस अधिका-याची बदली होण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे मीना यांच्यासारख्या आयएएस अधिका-यांना चांगलाच धडा या निमित्ताने मिळाला

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक